पुन्हा पावसाला सांगायचे.. कुणाला किती थेंब वाटायचे..




पुन्हा ढग दाटून येतात,

पुन्हा आठवणी जाग्या होतात..

तिचे माझे सारे पावसाळे,

माझ्या मनात भिजून जातात..

पुन्हा पाऊस ओला ओला,

पुन्हा पाऊस बांधून झुला..

तिच्याकडचे उरले झोके,

परत करतो माझे मला..

पुन्हा पाऊस खूप ऐकतो,

पुन्हा पाऊस खूप बोलतो..

त्याच्या माझ्या गप्पा मधले,

तिचे थेंब अलगद झेलतो..

पुन्हा पावसाला सांगतो मी,

पुन्हा पावसाशी बोलतो मी..

माझे तिचे आठवण थेंब,

पुन्हा पावसालाच मागतो मी….!!!

Reviewer4you
Logo
Register New Account